Dr K.G. Belorkar
|
|
पुसद येथे एकामागून एक नवीन महाविद्यालय सुरु होत होते. परंतु पुसद येथे आयुर्वेद महाविद्यालय नव्हते व त्याचीच खंत मला वाटत होती. तसेच सुमनताई नाईक यांना आयुर्वेद विषयी तशी बरीच आस्था होती. त्यांना बऱ्याच वनस्पतीची माहिती होती व त्यांनाही पुसद येथे आयुर्वेद महाविद्यालय व्हावे असे वाटत होते.सुधाकरराव व मी महाविद्यालय काळापासूनचे जवळचे मित्र होतो. २५ जून १९९१ रोजी सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झाले आणि मी त्यांच्या समोर, पुसदला लवकरात लवकर आयुर्वेद महाविद्यालय सुरु करावे असा प्रस्ताव ठेवला .त्यांनी लगेच श्री गजानन महाराज संस्थान पुसद येथे माझ्या विनंतीवरून आयुर्वेद महाविद्यालय विनाअनुदानित तत्त्वावर मंजूर केले. त्यावेळेला आमच्या गजानन महाराज संस्थानाचे अध्यक्ष डॉ श्याम भंडारी होते.त्यांनी आयुर्वेद महाविद्यालयाचा अध्यक्षपदाचा कारभार माझ्याकडे सोपवला व मी सन १९९२ ते २००१ पर्यंत अध्यक्षपदाचा कार्यभार सुधाकरराव नाईक साहेबानी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडला.सुधाकरराव नाईक साहेबानी १७ ऑगस्टला आमच्या महाविद्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री असताना केले तसेच त्यांनी व सुमनताई यांनी आमच्या आयुर्वेद महाविद्यालयाला भरघोस आर्थिक मी मिळवून दिली.त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे असे मी मानतो.आज आमचे महाविद्यालय त्यांच्याच प्रेरणेने उभे आहे.श्री जयभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित भंडारी आयुर्वेद महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळीत आहेत
|